शनिवार, दिनांक 15 एप्रिलची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. मुंबई पुणे जुना महामार्गावर खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिंग्रोबा मंदिराजवळ एक बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली आहे. यात प्राथमिक माहितीनुसार 8 ते 9 जण दगावले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर घटना खोपोली पोलीस ठाणे, रायगड मधील आहे. शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास हा अपघात झाला. जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये खाजगी बस शनिवारी पहाटे दरीमध्ये कोसळली. यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील 8 ते 9 लोक मयत झाल्याचे आणि वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मदतकार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी, शिवदुर्ग टीम, हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम, पोलिस, अग्नीशमन दल आहे. तसेच खासगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ( Private bus fattal accident on old pune mumbai highway near shingroba tempale 8 people dead )
सदर खाजगी बस बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून ते गोरेगाव इथे जात असताना परतीच्या मार्गावर हा अपघात झाला, अशी माहिती, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
– आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठका