स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दिनांक १६ एप्रिल) रोजी संपन्न होणार आहे. यंदा प्रतिष्ठानच्या वतीने दशकपूर्ती सोहळा साजरा होत असून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा विवाह सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे आणि सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश विनोदे यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्यक्रमाची रुपरेषा….
रविवारी पहाटे ५ वाजता श्री. पोटोबा महाराजांच्या अभिषेकाने या सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. सकाळी ११.३० वाजता साखरपुडा, दुपारी १.३० वाजता हळदी समारंभ, दुपारी १२ ते ३ भोजन, दुपारी ३ वाजता नवरदेवांची मिरवणूक व सायंकाळी ५.३० वाजता लग्नसोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी संसारपयोगी भांडी, पोशाख, फेटा, बाशिंगे, चांदीचे अलंकार आदी बाबी प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणार आहेत.
सामुदायिक विवाह सोहळा समितीचे कार्याध्यक्ष सदाशिव गाडे, कार्यक्रम प्रमुख विवेक गुरव, प्रकल्पप्रमुख अतुल राऊत, उपाध्यक्ष शंकर ढोरे, खजिनदार अनिल कोद्रे, सचिव अक्षय बेल्हेकर, सह खजिनदार महेश तुमकर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– भीषण अपघात! शिंग्रोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु
– ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी