जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज (शनिवार, 15 एप्रिल) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. ( Old Mumbai Pune Highway borghat bus accident help announced by CM Eknath Shinde )
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा – भीषण अपघात! शिंग्रोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी, बचावकार्य सुरु
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2023
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 29 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो.…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 15, 2023
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून प्रवासी मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी,वेदनादायक आहे. घटनेतील जखमींना तत्काळ उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी,ही प्रार्थना.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 15, 2023
अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे एक्सप्रेस वे सह ‘या’ मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी
– आजी, माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय बैठका