व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! प्रसिद्ध निरुपणकार डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रात पिता-पुत्रांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 8, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Appasaheb-Dharmadhikari

File Image


रेवदंडा (जि. रायगड) येथील ज्येष्ठ निरुपणकार डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणेजच 27 वा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे अनुयायी असलेल्या जगभरातील लाखो-करोडो श्रीसदस्य आनंदोत्सव साजरा करत आहे. ( Maharashtra Bhushan Award 2023 Has Been Announced To Famous Social Worker Dr Dattatreya Alias Appasaheb Dharmadhikari Raigad )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र भूषण स्व. डॉ नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र असलेले दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. त्यांच्या पत्नी स्व. अनिता धर्माधिकारी यांची त्यांना यात मोलाची साथ लाभली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ सचिन दादा धर्माधिकारी हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा आणि अध्यात्मविद्येचा वारसा चालवत आहेत. स्व. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात पिता-पुत्रांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

हेही वाचा – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे समाजोपयोगी उपक्रमातील योगदान गौरवास्पद ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री समर्थ अध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग येथून आप्पासाहेब धर्माधिकारी जगभर पसरलेला सगळा कार्यभाग सांभाळत असतात. यासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत समाजसेवेचे कार्य अविरत सुरु असते. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून या कार्याला सुरुवात केली. ग्रंथराज श्रीमत दासबोध घराघरात पोहचवून त्याच्या आधारे आणि आपल्या प्रासादिक वाणीने, मौखिक निरुपणाच्या साहाय्याने श्रीबैठकांद्वारे नानासाहेबांनी प्रत्येकाच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. आज तेच कार्य, तेवढ्याच ताकदीने डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी जगभर पोहोचवत आहेत. त्यांच्या कार्याचा आज महाराष्ट्र शासनाने उचित गौरव केला, असेच म्हणावे लागेल.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी मिळालेले पुरस्कार

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वीच देशाचा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2014 मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यासह युरोपियन विद्यापीठाच्या वतीने ‘द लिव्हिंग लेजंड’ पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– मुंबई ते सोलापूर मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस; खंडाळा-लोणावळा घाट मार्गातील चाचणी पूर्ण – पाहा व्हिडिओ
– वडगावात रविवारी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात रविवारी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
water-supply-scheme

तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.