तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 2019 च्या कार्यकाळात राज्य सरकारच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहराच्या पाणी योजनेसाठी 51 कोटी रुपये मंजूर करून घेण्यात आले होते. या कामाची प्रत्यक्ष पाहणी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी नुकतीच केली. तसेच, उर्वरित काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून या योजनेचे काम सुरु असून एकूण 110 किलोमीटर पाईप, 6 पाण्याच्या टाक्या यांतून संपूर्ण तळेगाव दाभाडे शहरात एकूण 19000 नळ कनेक्शन उपलब्ध होणार आहेत. ( tap water supply scheme talegaon dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रवेळी माजी नगराध्यक्ष मा श्री रविंद्र दाभाडे, भा.ज.पा. शहराध्यक्ष रविंद्र माने, मा नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, अमोल शेटे, संतोष भेगडे पाटील, अरुण भेगडे, सचिन जाधव, नितीन पोटे, निर्मल ओसवाल, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, महाराष्ट्र विदयुत विभागाचे गजानन झोपे, तळेगाव नगरपरिषद क्षेत्रातील विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावात रविवारी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम, अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता लोणावळ्यासाठी शिवाजीनगरहून 4 लोकल सुटणार, पाहा वेळापत्रक