व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 14, 2026
in महाराष्ट्र
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशी अडवणूक करणे योग्य नसून, महसूल, गृह आणि मृद व जलसंधारण विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

मृद व जलसंधारण विभागाच्या १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील जलसाठ्यांमध्ये साचलेला गाळ काढणे तसेच नाल्यांचे खोलीकरण करण्याची कामे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने केली जातात.

ही कामे अशासकीय संस्थांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून राबविण्यात येतात. तसेच जलसाठ्यांमधून काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पसरविण्यात येतो. या गाळावर स्वामित्व शुल्क (Royalty) माफ करण्याची तरतूद असून, त्यास ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

क्षेत्रीय स्तरावर ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान’ अंतर्गत गाळ वाहतूक करणाऱ्या वाहनांची विविध विभागांच्या यंत्रणांकडून अडवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गाळ वाहतूक आणि शेतांमध्ये गाळ पसरविण्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभाग, महसूल विभाग आणि गृह विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन 


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

Next Post

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.