महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव मधील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने शहरातील जेष्ठ नागरिकांना शुक्रवारी, दिनांक 14 एप्रिल पीएमपीएमएल बस सेवेचे मोफत पास देण्यात आले.
वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात जेष्ठ नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत या कायमस्वरूपी मोफत बस पास सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. वडगाव शहरातील वय वर्षे 60 पूर्ण असणाऱ्या 51 जेष्ठ नागरिकांना शुक्रवारी प्रतिनिधीक स्वरूपात मोफत बस सेवेचे पास वाटप करण्यात आले. ( Free passes for PMPML bus service to senior citizens of Vadgaon city initiative of Morya Mahila Pratishthan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सामाजिक बांधिलकी जपत बस पास सेवेचा उपक्रम हा कायमस्वरूपी चालू ठेवण्यात येणार आहे, यावेळी अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिकांना दिली. तसेच, वडगाव शहरातील अजून कोणत्याही जेष्ठ नागरिकांना दररोज अथवा महिन्याचा पास काढून पाहिजे असल्यास जनसंपर्क कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधून शासनाने ठरवून दिलेल्या आवश्यक अशा कागदपत्रांची पूर्तता करून मोफत पास घेऊन जावे, असे आव्हान नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.
सदर कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी ग्रा.पं. सरपंच नंदाताई ढोरे, वडगाव रा. काँ. ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष शांताराम कुडे, सामाजिक कार्यकर्ते नितीन भांबळ, एँड. शामराव ढमाले, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत झरेकर, हभप विठ्ठल ढोरे, रा. काँ. युवक शहराध्यक्ष अतुल वायकर, वडगाव रा. काँ. सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, प्रभाग क्रमांक सात चे अध्यक्ष अशिष भालेराव, उद्योजक अजय भवार, किरण ओव्हाळ, विकी कदम आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांची तळेगावमधील इफ्तार पार्टीला हजेरी; मुस्लिम बांधवांना दिला संदेश
– बोरघाट बस अपघात । मुख्यमंत्री शिंदेंकडून दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार