‘मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशन धान्य मिळत नाहीये. याबाबत अनेकवेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे महिलांना मिळतात. अनेकदा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकारी ऑफिसमध्ये नसतात. मग नागरिकांचे प्रश्न कसे सुटणार?’ असे सांगत महिलांच्या विविध समस्यांबाबत सायली बोत्रेंच्या नेतृत्वात सोमवारी (दिनांक 17 एप्रिल) तहसीलदार मावळ यांना निवेदन देण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महिलांना वारंवार वडगावच्या फेऱ्या माराव्या लागणार नाही, याची अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन अनेक पेन्शन धारकांची थांबली आहे, ती त्वरित चालू करावी. काही शासकीय अडचणी असतील तर त्या पूर्ण करून निराधार तसेच विधवा महिलांना न्याय मिळवून द्यावा, अशी प्रकारची विनंती मावळचे नवनियुक्त तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी मावळ तालुका भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सायली जितेंद्र बोत्रे, तालुका महिला सरचिटणीस अनिता सावले, नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्ष सीमा आहेर तसेच अनेक गावच्या महिला मोठ्या संख्येने तहसील कचेरी मध्ये उपस्थित होत्या. ( letter from BJP Mahila Aghadi to Tehsildar Vikram Deshmukh regarding various problems of women in Maval taluka )
अधिक वाचा –
– टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना
– वडगावमधील सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध