व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा पोलिसांची धडक कारवाई! खंडाळ्यात ऑनलाईन मटक्यावर छापा, 1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी शनिवारी (15 एप्रिल) रोजी रात्री लोणावळा जवळील खंडाळा इथे सुरू असलेला एका मटक्याचा अड्डा उधळून लावला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 17, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Photo : Crime


लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी शनिवारी (15 एप्रिल) रोजी रात्री लोणावळा जवळील खंडाळा इथे सुरू असलेला एका मटक्याचा अड्डा उधळून लावला आहे. या छाप्यात 1 लाख 38 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून पाच जणांविरोधात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रितेश शाम दळवी (वय 27, रा खंडाळा बाजारपेठ), सुरेश मानकर (वय 62, रा कुणेनामा ता मावळ), युसुफ तय्यबअली शेठीया (रा समरहिल, कुणेनामाता मावळ), मुनीर अब्दुला रहेमान बागवान (वय 52, रा हनुमानटेकडी, लोणावळा), लतीकेश शाम दळवी (वय 23, रा खंडाळा बाजारपेठ) यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. ( Lonavala City Police Action Taken Under IPS Satyasai Karthik Against 5 people Playing Matka Online In Khandala )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खंडाळा गावच्या हद्दीतील तळ्याच्या शेजारी एका बाकड्यावर बसून काही लोक बेकायदेशीरपणे मोबाईलचा वापर करून कल्याण मटका जुगार खेळत आहेत. ही खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी लगेच पथकाला छापा टाकण्याच्या सूचना दिल्या.

सर्वजण खासगी गाडीने घटनास्थळी पोहचले. तिथे गाडी उभी करून ते लपत छपत त्या ठिकाणी गेले असता तेथे पाच इसम बसलेले दिसले. त्याठिकाणी ते हातामध्ये मोबाईल घेऊन चिठ्ठीवर आकडेमोड करीत होते. दरम्यान त्यांना पोलिसांची चाहूल लागताच ते पळून जावू लागले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडून त्यांची चौकशी करीत त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल आणि 20 हजार 790 रुपयांची रोकड जप्त केली. पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल करत आहेत.

अधिक वाचा –
– महिलांच्या विविध समस्यांबाबत भाजपा महिला आघाडीकडून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन
– टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत 34 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, टाकवे-वडेश्वर रोडवरील घटना


dainik maval jahirat

Previous Post

महिलांच्या विविध समस्यांबाबत भाजपा महिला आघाडीकडून तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन

Next Post

तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत 3 हजार रुपये मासिक अनुदान मिळणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kishor-Aware

तळेगाव दाभाडे शहरातील दिव्यांग बांधवांना पूर्ववत 3 हजार रुपये मासिक अनुदान मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.