कृषि उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडे (मावळ तालुका) निवडणूकीसाठी आज (शुक्रवार, दिनांक 28 एप्रिल) रोजी मतदान पार पडले. उन्हाच्या झळा अंगावर घेत मतदारांनी त्यांच्या मतदारांचा हक्क बजावला. एकूण 1618 मतदारांपैकी तब्बल 1590 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ही 98.27 टक्के इतकी असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी दिली. वडगाव मावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इथे ही मतदानाची प्रक्रिया पार पडली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एकूण झालेल्या मतदानापैकी; ग्रामपंचायत वर्गातील एकूण 852 मतदारांपैकी 836 मतदारांनी मतदान केले. तसेच कृषी पतसंस्था वर्गातील 648 मतदारांपैकी 643 मतदारांनी मतदान केले. व्यापारी वर्गातील 108 मतदारांपैकी 101 मतदारांनी मतदान केले. तर हमाल मापारी वर्गातील एका जागेसाठी 10 पैकी 10 मतदारांनी मतदान केले.
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जागांसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपा प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचे एकूण 18, महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल याचे 18 आणि 4 अपक्ष उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या शनिवार (दिनांक 29 एप्रिल) रोजी सकाळी 9 वाजता पंचायत समिती कार्यालय इथे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ( 98.27 percent voting for Maval Agricultural Income Market Committee elections )
अधिक वाचा –
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
– कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान, जाणून घ्या सविस्तर