व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 98.27 टक्के मतदान; 1,590 मतदारांनी बजावला हक्क, शनिवारी मतमोजणी

कृषि उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडे (मावळ तालुका) निवडणूकीसाठी आज (शुक्रवार, दिनांक 28 एप्रिल) रोजी मतदान पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 28, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
voting election

Photo Courtesy : Team Dainik Maval


कृषि उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडे (मावळ तालुका) निवडणूकीसाठी आज (शुक्रवार, दिनांक 28 एप्रिल) रोजी मतदान पार पडले. उन्हाच्या झळा अंगावर घेत मतदारांनी त्यांच्या मतदारांचा हक्क बजावला. एकूण 1618 मतदारांपैकी तब्बल 1590 मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी ही 98.27 टक्के इतकी असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांनी दिली. वडगाव मावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इथे ही मतदानाची प्रक्रिया पार पडली.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एकूण झालेल्या मतदानापैकी; ग्रामपंचायत वर्गातील एकूण 852 मतदारांपैकी 836 मतदारांनी मतदान केले. तसेच कृषी पतसंस्था वर्गातील 648 मतदारांपैकी 643 मतदारांनी मतदान केले. व्यापारी वर्गातील 108 मतदारांपैकी 101 मतदारांनी मतदान केले. तर हमाल मापारी वर्गातील एका जागेसाठी 10 पैकी 10 मतदारांनी मतदान केले.

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जागांसाठी एकूण 40 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपा प्रणीत छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनलचे एकूण 18, महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल याचे 18 आणि 4 अपक्ष उमेदवार आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या शनिवार (दिनांक 29 एप्रिल) रोजी सकाळी 9 वाजता पंचायत समिती कार्यालय इथे मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ( 98.27 percent voting for Maval Agricultural Income Market Committee elections )

अधिक वाचा –
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
– कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान, जाणून घ्या सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी 28 आणि 30 एप्रिल रोजी मतदान, जाणून घ्या सविस्तर

Next Post

जर्मनीच्या अधिकाऱ्यांची थेट वडगाव मावळमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-School

जर्मनीच्या अधिकाऱ्यांची थेट वडगाव मावळमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

July 6, 2026
पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

July 6, 2026
Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

July 5, 2026
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू

July 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.