व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

वेगवेगळ्या प्रकारच्या 39 वाहनांवर कारवाई, 44 हजार रुपये दंड वसूल

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 6, 2026
in लोकल, शहर
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर वर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत बुलेटचे सायलेन्सर जप्त केले आहेत. मागील काही महिन्यांपासून लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेकडून वारंवार अशा कारवाया होत असताना देखील अनेक तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज करणारे व सायलेन्सर मधून फटाके वाजवणारे सायलेन्सर बसवून बाजारपेठेमध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शांततेचा भंग करत आहेत. अनेक दिवसाची चालक आपल्या गाड्यांचे नंबर प्लेट फॅन्सी बनवत आहेत अनेक जण नंबर प्लेटच्या जागांवर दादा, भाऊ अशी नावे किंवा बैल जोडी यांची चित्रे लावत आहेत.

मागील काळामध्ये दुचाकीच्या सायलेन्सर वर लोणावळा शहर पोलिसांनी बुलडोझर फिरवत त्यांचा चुराडा केला होता. आता देखील गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले जात आहेत व त्यांच्यावर पुढील काळात बुलडोजर देखील फिरवला जाणार आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन व कारवाई करून देखील काही दुचाकी चालक कायद्याचा व नियमांचा वारंवार भंग करत आहे. बहुतांश दुचाकी चालक हे महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक असल्याचे निदर्शनास येत आहे.

अनेक चार चाकी वाहनांच्या काळ्या काचांवर देखील पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. अनेक चार चाकी चालक हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दंड वाचवण्यासाठी नंबर प्लेटवर टेप लावून नंबर झाकत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत असे प्रकार सर्रासपणे दिसून येत आहेत. लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले नियमांचा व कायद्याचा भंग करून वाहने चालवणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाणार आहे.

अनेक चार चाकी वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर लावले जात आहेत. अशा वाहनांची देखील पडताळणी करत, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अशीच स्टीकर लावलेली एक चार चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली होती त्याच पद्धतीने कारवाया केल्या जाणार आहेत. अनेक चार चाकी वाहन चालक पोलीस कारवाया व टोल नाक्यांवर सवलत मिळावी याकरिता कोणाच्यातरी नावाचे स्टिकर आपल्या गाड्यांवर लावत आहेत. व आपण कोणत्यातरी नेत्याचे पुढाऱ्याचे जवळचे असल्याचे भासवत आहेत.

पोलिसांनी मात्र अशा वाहनांवर देखील कारवाई मोहीम हाती घेतली आहे, दोषी आढळणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. पुणे पिंपरी भागात देखील आशा वाहनांवर आयुक्तालयाच्या माध्यमातून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी नुकत्याच राबवलेल्या कारवाई मोहिमेत 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 44 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दुचाकी वाहनांचा समावेश आहे. काही चार चाकी वाहने देखील आहेत.

सदरची कारवाई ही लोणावळा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चमन शेख, पोलीस कॉन्स्टेबल शितोळे आदींच्या पथकाने केली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ
– मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला
– शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक


dainik maval jahirat

Previous Post

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील 'त्या' अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं... पोलिसांकडून मोठा खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Photo Courtesy : Team Dainik Maval

Vadgaon Maval : अतिक्रमणाच्या भस्मासूरामुळे वडगाव मावळ शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यासह सेवा रस्ते झाले अरूंद

November 23, 2026
Sub-national Pulse Polio Immunization Campaign at Karla Maval launched by ZP Chairperson Dipali Hulawale

कार्ला येथे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ; जिल्हा परिषदेच्या सभापती दिपाली हुलावळे यांच्या अभियानाचा शुभारंभ

November 23, 2026
Roadworks covering 418 km for Pune Grand cycle Tour widening repairs strengthening underway in five phases

पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू

November 23, 2026
3832 Anganwadi in maharashtra to become smart Minister Aditi Tatkare shares information

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

November 22, 2026
Agriculture Department is supplying sorghum seeds and free chickpea seeds in Pune district

पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा

November 22, 2026
drought-affected taluka total number of talukas in state declared as drought-affected now stands at 310

३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

November 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.