मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) सोमाटणे फाटा ( Somatne Fata ) येथे गुरुवारी (दिनांक 29 सप्टेंबर) रोजी दुपारच्या सुमारास शोले चित्रपटातील सीनसारखा प्रसंग घडला. एक मनोरुग्ण महावितरण कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टाॅवरवर चढला. त्यानंतर वीजतारांना पकडून लोंबकळत राहिला. सुदैवाने 50 फूट उंचीवरून पडूनही तो बचावला आहे. चिखलात पडल्याने त्याला काही गंभीर दुखापत झाली नाही. परंतू, या घटनेचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे. ( Psychiatric Youth Climbs 50 Feet High Electricity Tower Somatne Fata Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मनोरुग्ण तरुण टॉवरच्या टोकावर चढला. त्यानंतर सर्वात वरच्या वीजेच्या तारेला लोंबकळून राहिला. सुदैवाने यंत्रणेने अगोदरच वीजप्रवाह खंडीत केला होता, त्यामुळे त्याला शॉक बसला नाही. टॉवरवर चढल्यानंतर सर्वात वरच्या तारेवर तो लोंबकळत होता. तसाच पुढे सरकत होता. तो हेलकावे खात असताना पडेल या भीतीने उपस्थित नागरिक ओरडत होते. तसेच काहींनी हा प्रसंग कॅमेरात कैद केला. थोड्यावेळाने वीज तारेवरुन अतिहेलकाव्याने मनोरुग्णाचे हात सुटून तो खाली पडला. परंतू खाली पडताना अगोदर तो झाडांच्या फांद्यांवर पडला आणि त्यानंतर झाडांखाली गवत आणि चिखलात पडला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही.
अग्निशमन दल, पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार सदर तरुणाला बोलता येत नसल्याचे समजत आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. ( Psychiatric Youth Climbs 50 Feet High Electricity Tower Somatne Fata Maval )
अधिक वाचा –
मावळवासियांसाठी गुडन्यूज!
BREAKING : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकरला भीषण आग, बचाव कार्य सुरु I Video