व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील पहिला ‘आपला दवाखाना’ तळेगावमध्ये सुरु, बाळा भेगडेंच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी ( 1 मे ) तळेगाव दाभाडे येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे उदघाटन माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 1, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
Aapla-Dawakhana-in-Maval-taluka

Photo Courtesy : Twitter / Bala Bhegade


महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी ( 1 मे ) तळेगाव दाभाडे येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चे उदघाटन माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. ( First Hinduhriday Samrat Balasaheb Thakre Aapla Dawakhana in Maval taluka started in Talegaon dabhade )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. आता वाढत्या शहरीकरणाचा व विस्तारित शहरांचा विचार करता गोरगरीब रुग्णांना सामान्य आजारांसाठी तात्काळ आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा मिळणे ही मोठी गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीकोनातून ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करण्यात येत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने पहिल्या टप्प्यात दोनशे दवाखान्यांना मान्यता दिली होती. कोरोना काळात यातील फारच थोडे दवाखाने प्रत्यक्षात सुरू होऊ शकले. मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

मावळ विधानसभा मतदार संघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे पहिल्या 'आपला दवाखाना ' चा शुभारंभ मा. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे पार पडले…सदर कार्यक्रमाला प्रमुख उदघाटक म्हणून उपस्थित होतो.@BJP4Maharashtra pic.twitter.com/RGfPWaRSbs

— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) May 1, 2023

मावळ विधानसभा मतदार संघातील तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे पहिल्या ‘आपला दवाखाना ‘ चा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणाली द्वारे पार पडला. यावेळी प्रत्यक्ष बाळा भेगडे यांनी फीत कापून दवाखान्याचे उद्घाटन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील, तालुका आरोग्यधिकारी डॉ. लोहारे, ऍड. रवीनाना दाभाडे, मा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मा नगरसेवक अरुण भेगडे, शोभा भेगडे, सचिन टकले, रजनी ठाकूर, शोभा परदेशी आदी उपस्थित होते. ( First Hinduhriday Samrat Balasaheb Thakre Aapla Dawakhana in Maval taluka started in Talegaon dabhade inaugurated by Bala Bhegade and CM Eknath Shinde )

अधिक वाचा –
– वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ । पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून 3 मे रोजी किल्ले लोहगड इथे स्वच्छता अभियान


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात ‘मल्हार’ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा । Maharashtra Din 2023

Next Post

मोरवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त स्वच्छता मोहिम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
cleanliness-campaign-by-students

मोरवे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र दिनानिमित्त स्वच्छता मोहिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.