भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने हिंदवी स्वराज्यरक्षक “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती” दिनाचे औचित्य साधून “श्री मृत्युंजय रक्तसंकलन महामेळावा” चे आयोजन करण्यात आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण करण्याकरीता आपले बहुमूल्य रक्त कर्मी आणले. शंभूराजेंच्या याच ज्वलंत प्रेरणेने समाजातील गरजवंत रुग्णांप्रती असलेल्या काळजीपोटी समिती सदस्यांनी एकत्र येत पुण्यातील नामांकित जहांगीर हॉस्पिटल मधील रक्तपेढीत नि:संकोचपणे रक्तदान करून या संकल्पनेची पूर्तता केली गेली.
वैद्यकीय क्षेत्रात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने मध्यंतरी अनेक वृत्तसमूहांनी सर्व नागरिक आणि सामाजिक संस्थांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या बहुमूल्य रक्ताची एक बॅग स्वराज्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्पण करून समिती सदस्य सामाजिक सहकार्याचा निर्मळ संदेश सर्वदूर पोचविण्यास सेवार्थ झाले. याचे रक्तपेढीतील सर्व वैद्यकीय कर्मचारी वृंदाने मनापासून कौतुक केले.
रक्तदान केलेल्या प्रत्येक सदस्यास रक्तपेढी आणि समितीच्या वतीने गौरविण्यात आले. तसेच अतिशय काळजीपूर्वक रक्त संकलित करून घेतल्याने जहांगीर हॉस्पिटल रक्तपेढीतील कर्मचारी वृंदाचा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. अशाच प्रकारचे उपक्रम भविष्यात राबवून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत समिती सदस्यांनी एकमेकांप्रती आभार प्रदर्शित केले. ( Blood donation camp by Devdarshan Yatra Samiti Pune on occasion of Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti )
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : 6 आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी विशेष पथक । Kishor Aware Murder Case
– वडगाव नगरपंचायतीकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे-नाले सफाईचे काम सुरु