जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद समोर निघृण हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुख्य सूत्रधारासह एकूण सहा आरोपींना अटक केली. सदर 6 आरोपींना वडगाव मावळ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना येत्या 20 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
1) शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), 2) प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32, रा. नाणे, ता. मावळ), 3) आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, रा. नाणे, ता. मावळ), 4) संदीप उर्फ नान्या विठ्ठल मोरे (रा. आकुर्डी, पुणे), 5) श्रीनिवास उर्फ सिनू वेंकटस्वामी शिडगळ (वय 41, रा. समता कॉलनी, वराळे रोड, तळेगाव दाभाडे ता.मावळ) आणि मुख्य सूत्रधार 6) गौरव चंद्रभान खळदे (वय 29, घर नंबर-111, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या 6 आरोपींची नावे आहेत. ( Kishor Aware Murder Case 6 accused remanded in police custody till May 20 )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी गौरव खळदे याने वडील चंद्रभान खळदे यांना दिवंगत किशोर आवारे यांनी तळेगाव नगरपरिषद इथे कानाखाली मारल्याच्या रागातून त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी शाम अरुण निगडकर यास सुपारी दिली होती. आणि शाम अरुण निगडकर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सदर गुन्ह्याचा आणखी तपास सुरु असून गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
अधिक वाचा –
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर
– बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांचा दणका! लाखोचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा