लोणावळा शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांत बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यात पाेलिसांनी मद्यसाठ्यासह 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी भरत लक्ष्मण कदम आणि गणेश पांडुरंग साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 मे रोजी संजीवनी हॉस्पिटल रोडवर भरत कदम ( वय 36, रा. ता. मुळशी) हा त्याच्या कारमधून बेकायदा विक्रीसाठी 24 बियरच्या बाटल्या, देशी दारूच्या 48 बाटल्या, विदेशी दारुच्या 10 बाटल्या घेऊन चालला हाेता. त्याची चाैकशी केली असता त्याला समर्पक उत्तर देता न आल्याने पाेलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. ( case registered against two people who selling illegal liquor action taken by lonavla city police )
तर, दुसऱ्या घटनेत गणेश साळवे (वय 35, रा. ता. मावळ) हा त्याच्या दुचाकीवरुन विदेशी दारुच्या 21 बाटल्या, देशी दारूच्या 47 बाटल्या, अन्य एका कंपनाच्या दारूच्या 21 बाटल्या बेकायदेशीर विक्रीसाठी घेऊन जात असताना आढळून आला. त्याला देखील पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस नाईक हनुमंत शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र मदने, मनोज मोरे यांनी या दोन्ही कारवाई केल्या. आरोपींच्या विरोधात मु. प्रो. अॅक्ट क. 65 (ई) (अ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक वाचा –
– ‘खरं हाती येईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं..’, आमदार शेळकेंसाठी नगराध्यक्ष मयूर ढोरेंची भावूक पोस्ट, वाचा सविस्तर
– किशोर आवारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वडिलांना कानाखाली मारल्याच्या रागातून मुलाने बनवला ‘मास्टर प्लॅन’? लगेच वाचा