जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. शनिवारपर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गौरव खळदे याच्या अटकेनंतर किशोर आवारे हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अटक आरोपींनीही हत्येमागचे कारण सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर गौरव खळदेला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वी जुन्या तळेगाव नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. वडीलांच्या कानाखाली मारली याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरव याने बदला घेण्याचे ठरवले आणि त्यानुसार नगरपरिषद कार्यालयात किशोर आवारे यांची निर्घृण पणे हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. ( Gaurav Bhanu Khalde son of former Corporator of Talegaon nagarparishadarrested in Kishor Aware murder case )
अधिक वाचा –
– मळवली येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 जोडपी विवाहबद्ध, मंत्री तानाजी सावंत यांचीही उपस्थिती
– विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती