मावळ तालुक्यातील मळवली इथे शुक्रवार (दिनांक 12 मे) रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा 2023 मोठ्या आनदांत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 6 जोडपी विवाहबद्ध झाली. महत्वाचे म्हणजे परंडा विधानसभेचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत हेही या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा 2023 याचे हे पहिलेच वर्ष होते. मळवली येथील रेल्वे स्टेशन शेजारील मैदानात हा भव्य विवाह सोहळा पार पडला. सहाही जोडप्यांचा विवाह वेगवेगळ्या मुहूर्तावर पार पडला. आयोजकांनी या सोहळ्यासाठी अत्यंत उत्तम असे नियोजन केले होते. वधू वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आवश्यक अशा अनेक महत्वाच्या वस्तू तसेच अनेक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या. ( Dharamveer Chhatrapati Sambhaji Maharaj Community Marriage Ceremony 2023 Six Couples Married at Maval Taluka Malavli )
हेही वाचा – कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ
यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा संस्थापक अध्यक्ष शरदराव हूलावळे, सामुदायिक विवाह सोहळा 2023 समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शेलार, अध्यक्ष दत्ताभाऊ केदारी, कार्याध्यक्ष संतोष केदारी, उपाध्यक्षा सायली बोत्रे, सचिव सचिन भानुसघरे, सहखजिनदार मच्छिंद्र केदारी, सल्लागार अॅड जयवंत देशमुख तसेच सर्व सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी गजाआड, अशी केली कारवाई
– विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती