आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातून नाणे गावातील नळ पाणी पुरवठा योजनेला तब्बल 2 कोटी 84 लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून होणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा गुरुवार (दिनांक 11 मे) रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील अनेक गावात जल जीवन मिशन योजनेद्वारे नळ पाणी पुरवठा योजना राबवल्या जात आहेत. यातून घरोघरी जलगंगा येत असल्याने महिला भगिनींची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. ( Bhoomipujan of tap water supply scheme in Nane village Jal Jeevan Mission Scheme in Maval Taluka )
मावळ तालुक्यातील नाणे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 11 मे रोजी संपन्न झाला. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत या पाणी योजनेसाठी सुमारे 2 कोटी 84 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या समारंभाला नाणे मावळातील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील ‘या’ भागात रविवारी पाणीबाणी! नागरिकांनी पाणी जपून वापरावे, वाचा संपूर्ण सुचना
– आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ