लोणावळा शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोणावळा शहरवासीयांना उद्या म्हणजेच रविवारी (दिनांक 14 मे) पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो. ( Water shut off in Bhangarwadi area of Lonavala city on Sunday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे नागरिकांसाठी सुचना?
लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडून नागरिकांसाठी एक सुचनापत्र जारी करण्यात आले आहे. ज्यात, सर्व नागरिकांना सुचना करण्यात आली आहे की, भांगरवाडी रेल्वे ब्रीजच्या कामात अडथळा असणारी पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन स्थलांतर करण्याचे काम चालू असल्याने रविवार दिनांक 14/05/2023 रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी या सुचनेची नोंद घ्यावी आणि या कालावधीसाठी सर्व नागरिकांनी मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा करुन ठेवावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
कुठल्या भागातील पाणीपुरवठा होणार बाधीत?
संपूर्ण भांगरवाडी परिसर, आदित्य सोसायटी, सर्वे नं. 30, हनुमान टेकडी, हुडको, कैलासनगर, बाजारभाग, वर्धमान सोसायटी, वार्ड- आण्णाभाऊ साठे वसाहत, लोणावळा गावठाण, वार्ड-एफ, वार्ड- डी, रायवुड, खोंडगेवाडी, भुशी, रामनगर इ. भाग यात समाविष्ठ आहे.
अधिक वाचा –
– आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ