वडगाव शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार तालुक्यात चांगलाच प्रसिद्ध आहे. या दिवशी अनेक शेतकरी व व्यापारी आपला शेतीमाल तसेच किरकोळ वस्तू विक्रीसाठी बाजारात आणत असतात. तसेच या वस्तू आदी शेतीमाल खरेदी करण्यासाठी शहर आणि पंचक्रोशीतून महिला व नागरिक मोठी गर्दी करत असतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आठवडे बाजाराच्या दिवशी नगरपंचायत प्रत्येक विक्रेत्याकडून स्वच्छता व आरोग्य आणि जागा भाडे म्हणून कर पावती आकरत असते. मात्र हा कर पूर्णपणे वसूल होतो का? किंवा कर्मचाऱ्यांकडून नगरपंचायतीकडे जमा केला जातो का? याची खातर-जमा करण्यासाठी, तसेच त्यातील पारदर्शकता पाहण्यासाठी वडगाव नगरपंचायतच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी स्वतः आठवड्या बाजारात जाऊन भाजीपाला विक्रेत्यांकडून कर आकारणी केली.
एरवी आठवडे बाजारातून नगरपंचायतला फक्त 50 टक्के महसूल जमा होत असतो. पण सायली म्हाळसकर यांच्या निर्णयामुळे 100 टक्के महसूल जमा झाला. यावेळी नगरपंचायत कर्मचारी शंकर ढोरे, रवी साबळे, प्रदीप तुमकर, रमेश कचरे आदी जण उपस्थित होते. ( 100 percent tax was collected from Vadgaon Maval Weeks Bazar by deputy mayor Sayli Mhalskar )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ
– आंदर मावळातील नागाथली गावात गोठ्याला आग लागल्याने सहा म्हशींचा होरपळून मृत्यू