मोरया प्रतिष्ठान व यशराज इंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून वडगाव शहरात “आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र” सुरु करण्यात आले. याच केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
वडगाव शहरातील रहिवाशांना आपले सरकार केंद्रातून डिजिटल पद्धतीने दर्जेदार सेवा देण्यात येईल. तसेच केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणाहून सर्व सेवा अतिशय अल्प दरात उपलब्ध होतील. सर्व प्रकारचे दाखले, अर्ज व इतर ऑनलाईन सेवा देण्यासाठी हे केंद्र सोईचे ठरेल अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, वि म शिंदे गुरुजी, गोरख ढोरे, लक्ष्मण ढोरे, सुरेश कुडे, नितीन भांबळ, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, वडगाव रा. काँ. अध्यक्ष प्रवीण ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अतुल वायकर, यशराज इंटरप्राईजेस दादासाहेब जावेर, विशाल वहिले, अतुल राऊत, रा. काँ. उपाध्यक्ष सचिन कडू, वडगाव रा. काँ. अल्पसंख्याक सेल अध्यक्ष मजहर सय्यद, उद्योजक अमर चव्हाण, उद्योजक सिद्धेश ढोरे आदी जण उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्रातून सर्व ऑनलाईन सेवा, आधार कार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांचे कर्जमाफी अर्ज, सातबारा, आठ अ, रेशनिंग कार्ड यासह अन्य सेवाही या केंद्रातून मिळणार आहे़. ( Aaple Sarkar Nagari E Suvidha Kendra started in Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– ‘आगामी काळात मावळातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न’ – आमदार शेळके
– वडगाव शहरात नव्याने होत असलेल्या तलाठी कार्यालयाचे आमदार शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– खासदार फंडातून वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 10 लाखांचा निधी – अनंता कुडे