शिवणे मावळ : पवन मावळातील डोणे येथील वारकरी सांप्रदायातील एक ज्येष्ठ व आध्यात्मिक क्षेत्रांशी जोडलेली नाळ व गावातील तरुणांच्या पाठीमागे नेहमीच आधारवडासारखे उभे राहणारे अशी ओळख असणारे नामदेव घारे यांची आढले बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी नाथा सावळे यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले याप्रसंगी सचिव तुकाराम लोहर व आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
1993 ते 2003 मध्ये सलग 10 वर्षे काॕस्प प्लॕन सामाजिक संस्थेचे माध्यमातून डोणे गावात विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली. यामध्ये प्रामुख्याने पाणी याविषयावर मार्ग काढत संपुर्ण गावठाण आणि वाडीवस्तीवर संस्थेचे माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठ्यपुस्तके तसेच शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल मिळवून देण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केले तसेच शेतकऱ्यांना बैलगाडी ते शेतीअवजारे पर्यत संस्थेच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
यावेळी उपस्थितीत डोणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक महाराज कारके, मावळ तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय कारके, सरचिटणीस – चंद्रकांत चांदेकर, पोलीस मिञ संघटना सचिव संदिप लांडगे, हभप अनिल महाराज घारे, उपसरपंच पोपट वाडेकर, राष्ट्रवादी डोणे अध्यक्ष राहुल घारे, शेखर काळभोर, समिर खिलारी, एकता प्रतिष्ठाणंचे अध्यक्ष योगेश कारके, सरपंच लहु सावळे, शरद घोटकुले, शहाजी घोटकुले, गणेश राजिवडे, गोरख साठे, दशरथ साठे, विश्वनाथ घोटकुले, संजय खिलारी व आढले बु., डोणे, दिवड, राजेवाडी व ओव्हळे गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते. ( Namdev Ghare unopposed as Chairman of Adhale Budruk Various Executive Services Society )
अधिक वाचा –
– वडगाव शहरात ‘आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र’ सुरू, संचालक सुभाष जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
– ‘आगामी काळात मावळातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न’ – आमदार शेळके