कडधे : पवन मावळातील कडधे गावातील कब्रस्थानास संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ बुधवार (दिनांक 10 मे) रोजी संपन्न झाला. या कामाकरिता आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून दहा लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.
कडधे येथे अल्पसंख्यांक समाज अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून येथील कब्रस्थानासाठी संरक्षक भिंत व्हावी, अशी नागरिकांची मागणी होत होती. या मागणीची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी अल्पसंख्यांक विकास विभाग अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला असून कामास तात्काळ सुरुवात केल्याने नागरिकांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले. ( mla sunil shelke big help construction work of protective wall for graveyard started at Kadhe village pavan maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी कडधे गावच्या सरपंच कुसुम केदारी, उपसरपंच बजरंग तुपे, संजय मोहोळ माजी सरपंच बबन तुपे, हरिचंद्र तुपे, विष्णु घरदाळे,नामदेव तुपे, दामु तुपे, बाळासाहेब मोहोळ, गोरख खराडे, नारायण भोकरे, आनंदा तुपे, सुदाम सुतार, संजय केदारी, याकुब मुलाणी, जुम्मन शेख, इम्रान तुपे, समीर शेख, मगभुल शेख, जावेद मुलाणी, शकील प्रधान, आलम शेख, राजु खराडे, अक्षय गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– नामदेव घारे यांची आढले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड
– वडगाव शहरात ‘आपले सरकार नागरी ई सुविधा केंद्र’ सुरू, संचालक सुभाष जाधव यांच्या हस्ते उद्घाटन