वडगाव मावळ शहरात 50 टक्के सवलतीच्या दरात वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
वडगाव नगरपंचायतीच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नामांकित कंपन्यांच्या घरगुती वापराच्या वस्तू 50 टक्के सवलतीच्या दरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर वस्तू बुकिंग आणि खरेदी करण्यासाठी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर या ठिकाणी लावलेल्या प्रदर्शन स्थळी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. या अभिनव उपक्रमांतर्गत सायकल, गॅस शेगडी, कुलर, टीव्ही, पिठाची गिरणी, पाणी फिल्टर, डिश टीव्ही इत्यादी वस्तूचे 15-मे रोजी नागरिकांना वाटप केले जाणार आहे. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– दुर्दैवी! मावशीसोबत फिरायला गेलेला दहा वर्षीय चिमुकला कुसगाव डॅममध्ये बुडाला
– वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन