कुसगाव डॅम इथे दहा वर्षीय बालक बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार (दि. 5 मे) रोजी घडली. आदर्श संतोष गायकवाड (वय 10, रा. वैद्यवाडी हडपसर, पुणे) असे सदर बालकाचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, आदर्श गायकवाड हा त्याची मावशी पल्लवी साळवे हिच्या सोबत उबेर गाडीमधून फिरण्यासाठी कासारसाई धरणावर आला होता. कुसगाव डॅम इथे तो आणि त्याची मावशी पाण्यात खेळण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शिरगाव परंदवाडी पोलीस स्टेशन येथून पीएसआय गावित, पोलीस हवालदार जॉन पठारे, पोलीस नाईक खेडकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
यासह वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा तसेच गावकऱ्यांच्या मदतीने चिमुकल्याचा लगेच शोध सुरु केला. मुलगा सापडल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पवना हॉस्पिटल इथे रवाना करण्यात आले. निलेश गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, विनय सावंत, अनिश गराडे आणि ग्रामस्त राजाराम केदारी आदींनी मुलाचा शोध घेण्यात मदत केली. ( ten year old boy from Hadapsar drowned in Kasarasai Kusgaon Dam maval taluka )
अधिक वाचा –
– वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन
– हजारो बौद्ध उपासकांच्या उपस्थितीत कार्ला लेणी इथे ‘महाबुद्ध वंदना’ संपन्न । बुद्धपौर्णिमा 2023