पवन मावळ भागातील सोमाटणे, चांदखेड, पाचाणे, दिवड, डोणे या गावांतील एकूण 15 दिव्यांग बांधवांना आवश्यक असणारे साहित्य मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने मोफत घरपोच देण्यात आले. दिव्यांग बांधवांना दररोजच्या जीवनात गरजेच्या असणाऱ्या व्हीलचेअर, वॉकर, काठी, कुबडी इ. वस्तु आमदारांनी घरपोच दिल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिव्यांग हे देखील समाजाचे घटक आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंदी राहून जिद्दीने प्रगती साधण्याची त्यांची धडपड असते. दिव्यांग बांधवांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता त्यांना यथोचित सहकार्य करण्याची गरज आहे. ( mla sunil shelke delivered essential items to 15 disabled people of Maval taluka free of cost )
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे यासाठी आमदार शेळके यांनी तालुक्यात विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक असणाऱ्या साहित्याचे त्यांनी वाटप केले होते. आजही अनेक दिव्यांग बांधव आवश्यक साहित्य-साधनांपासुन वंचित आहेत. ही समस्या ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी गरजु व्यक्तींना घरपोच साहित्य दिल्यामुळे त्यांना आधाराचा हात मिळाला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, राष्ट्रवादी दिव्यांग सेल अध्यक्ष साजन येवले, मारुती बावकर, दत्ता दाभाडे, संभाजी गायकवाड, आकाश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, सनी गायकवाड, गणेश आगळे, दिनेश गायकवाड, अमित कदम, माऊली पशाले, गोकुळ किरवे, नबी आत्तार आदी. मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगावमध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, सायली म्हाळसकरांचा उपक्रम
– वराळे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत अश्विनी शिंदे बिनविरोध, आमदार शेळकेंकडून अभिनंदन