दिवसभरात लाखो वाहनांची ये-जा होणारा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा फक्त राज्यातीलच नाही तर देशातील महत्वाचा एक्सप्रेस वे आहे. परंतू लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावर आजवर अपघातांची संख्याही ही अधिक राहिली आहे.
काही दिवसांपूर्वीच बोरघाट इथे झालेला बसचा अपघात सर्वांसाठी ताजा आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघातप्रवण भाग म्हणजे बोरघाट आणि येथील अनेक जागा. त्यामुळे आता याच भागात प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ( Height barricade to prevent accidents on Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खंडाळा बोरघाट इथे दस्तुरी गावाच्या हद्दीतील मॅजिक पॉइंट इथून जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीकडे जाणाऱ्या आणि खोपोलीहून लोणावळ्यात येणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जोडला गेला आहे तिथे मॅजिक पॉइंट आणि अंडा पॉइंटजवळ ‘हाइट बॅरिकेड’ बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता येथून अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही.
खंडाळा बोरघाट घाटातील तीव्र उतार आणि नागमोडी वळणाचा रस्ता, यामुळे इथे अनेकदा अपघात होता. तसेच घाटातील शिंग्रोबा मंदिर परिसरात सातत्याने अपघाताच्या घटना घडतात. यात आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या परिसरामध्येही सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हे उपाय करण्यात आले आहेत.
अधिक वाचा –
– आमदारांचा मदतीचा हात अन् दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हसू; सुनिल शेळकेंकडून दिव्यांगांना घरपोच साहित्य
– वडगावमध्ये 50 टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड, सायली म्हाळसकरांचा उपक्रम