व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘यापुढे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने, पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका’ – खासदार बारणे

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 5, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
shrirang-barne-mumbai-pune-expressway

Photo Courtesy : Twitter / Shrirang Barne


पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यापासून यापुढे जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. 8 दिवसात दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना मावळचे शिवसेना खासदार, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने खासदार बारणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. त्यानंतर महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’, खंडाळा येथील रस्त्याची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली. यावेळी बारणे यांनी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

वाहतूक विभागाचे पोलीस उपअधिक्षक तानाजी चिखले, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुर्ती नाईक, राकेश सोनवणे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता धनराज दराडे, एनएचआयचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर, आरआयबीचे जयंत डांगरे, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळ्याचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सुर्यकांत वाघमारे, निलेश तरस, विशाल हुलावळे, मुन्ना मोरे यावेळी उपस्थित होते. ( MP Shrirang Barne inspected black spot on Pune Mumbai Expressway at khandala lonavala )

खासदार बारणे म्हणाले, महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंताजनक आहेत. त्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बस दरीत पडली होती. तिथे कठडा बसविण्यात आला आहे. मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी बूम बसविले आहेत. यापुढे टोलनाक्यापासून जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. जेणेकरुन वाहनचालकांना शिस्त लागेल. अर्धवट कामे येत्या 8 दिवसात पूर्ण कराव्यात. दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करावेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत आज बैठक घेऊन सातत्याने होणाऱ्या अपघात स्थळाची पहाणी केली वाहातूक विभागाचे DYSP तानाजी चिखले,MSRDC कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे RIB चे जयंत डांगरे उपस्थित होते.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/3bLrf1iPGC

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) May 4, 2023

टनेलमध्ये वीजेची सोय नाही. तिथे वीज दिवे बसवावेत. अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग केल्यास दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचे कर्मचारी वाढवावेत. ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. त्या जागेवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी
– पुणे रेल्वे स्टेशन बाल स्नेही कक्षाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा, दोन मान्यवरांना ‘विशेष सामाजिक कार्य पुरस्कार’


dainik maval jahirat

Previous Post

पुणे रेल्वे स्टेशन बाल स्नेही कक्षाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा, दोन मान्यवरांना ‘विशेष सामाजिक कार्य पुरस्कार’

Next Post

मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने बहुमताने फेटाळला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar

मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने बहुमताने फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.