मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित श्रीरंग बारणे यांची युवासेना मावळ व पुणे लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ठाणे येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विश्वजित बारणे हे सातत्याने जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत असतात. तसेच चिंचवड भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांचे वडील खासदार श्रीरंग बारणे यांचा मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभेतही ते सातत्याने कार्यरत असतात. अशात त्यांच्यावर आता युवासेनेच्या माध्यमातून मावळ आणि पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली गेल्याने, भविष्यात विश्वजित बारणे राजकीय क्षेत्रात मोठ्या रणांगणात उतरु शकतात, अशी बोलले जात आहे. ( Vishwajit Shrirang Barne appointed as Yuvasena Maval and Pune Lok Sabha President )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी गजाआड, अशी केली कारवाई
– नाणे गावातील तब्बल 2 कोटी 84 लाखांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन । जल जीवन मिशन योजना