जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर हत्या करण्यात आली.
किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील 4 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिस, खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट, तसेच तळेगाव दाभाडे पोलिस यांनी तत्काळ शोधकार्य करुन गजाआड केले होते. त्यानंतर आता या प्रकरणातील पाचवा आरोपी नामे श्रीनिवासन शिडगळ उर्फ सिनू याला गुन्हे शाखा पथकाने देहूरोड येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. ( Fifth accused in Kishore Aware murder case arrested )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारी दुपारी किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी करत शोधाशोध सुरु केली. संपूर्ण मावळ परिसर पिंजून काढला. यासह पोलिसांची अनेक पथके तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. यात आरोपी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर यांना पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिटने अटक केली, तर संदीप मोरे याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्यानंतर आता आज (दिनांक 13 मे) सिनु उर्फ श्रीनिवास शिडगळ (रा. देहूरोड) याला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केले असल्याची माहिती समोर येत आहे. सीनु देहूरोड भागात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यामुळे आता एकूण पाच आरोपी गजाआड करण्यात आलेत. पैकी चार आरोपींना शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘आमदार सुनिल शेळकेंवर दाखल गुन्हा राजकीय आकसापोटी’; समर्थकांकडून रविवारी तळेगावात निषेध मोर्चा, पाहा पोस्ट
आमदार सुनिल शेळके यांच्यावरही गुन्हा दाखल
किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या मातोश्रींच्या फिर्यादीवरुन मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सुनिल शेळके यांच्यावर दाखल गुन्हा यासह त्यांच्या बंधूंवर दाखल गुन्हा हा राजकीय आकसापोटी असल्याचे त्यांचे समर्थकांनी सांगितले. तसेच याच्या निषेधार्थ उद्या तळेगाव दाभाडे शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ
– आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ