मावळ तालुक्यातील कार्ला येथे सोमवार (दिनांक, 24 एप्रिल 2023) रोजी श्री एकविरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाहसोहळा 2023 मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील विविध भागातील एकूण 16 विवाह जोडपी विवाह बंधवात बद्ध झाली. ( 16 couples tied knot at community wedding ceremony in karla maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री एकविरा दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी ट्रस्ट कार्ला वेहरगाव यांच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाहसोहळ्याचे यंदाचे हे 11 वे वर्ष होते. अतिशय देखणा आणि शाही असा हा सामुदायिक विवाहसोहळा सोमवारी सायंकाळी बरोबर 6 वाजून 30 मिनिटांनी श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण (मुंबई पुणे हायवे शेजारी) कार्ला फाटा इथे पार पडला. हजारोंच्या संख्येने वऱ्हाडी या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांपैकी मच्छिंद्र खराडे, बाळा भेगडे, सुनिल शेळके यांनी सर्वांचे स्वागत केले, तर श्रीरंग बारणे आणि हभप तुषार महाराज दळवी यांनी शुभाशिर्वाद दिले.
जोडप्यांना संसारासाठी मिळाले अनेक ‘आशिर्वाद’
या सर्व नव जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी अनेक वस्तूंरुपी आशिर्वाद समाजातील दानशूर मंडळीनी दिले. यात प्रत्येक वधूला एकतोळा सोन्याचे मंगळसुत्र, पायातील पैंजण, जोडवी, लग्नाची साडी आणि कन्यादान म्हणून पाच भांडी देण्यात आली. तसेच साखरपुड्यासाठी वरांना लागणारे ड्रेस, लग्नासाठी सुट आणि ब्लेझर, मनगठी घड्याळ, इस्त्री, पंखा, वधू राणीला साड्या, नाकातील नथ असे जवळपास प्रत्येक जोडीला दीड ते दोन लाखांचे साहित्य देण्यात आले. तसेच लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती.
हेही वाचा – वडगावमधील सामुदायिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध
कार्ला येथे आई एकविरा देवी सामुदायीक विवाह सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. @mieknathshinde @Dev_Fadnavis @pcmcindiagovin @PCMCSarathi pic.twitter.com/GiHZMq8IOe
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) April 24, 2023
खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनिल शेळके यांसह माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे संस्थापक भाई भरत मोरे, दीपक हुलावळे, मिलिंद बोत्रे, अजय शिराली तसेच यावर्षीचे विवाहसोहळा समितीचे अध्यक्ष संभाजी येवले, उपाध्यक्ष प्रकाश आगळमे, कार्याध्यक्ष सोमनाथ जांभळे, सचिव किरण येवले, सहसचिव संतोष ढाकोळ, खजिनदार संतोष भानुसघरे, सहखजिनदार गणपत विकारी यांच्यासह सोहळा समितीचे सर्व सभासद आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान