मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (तळेगाव दाभाडे) निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्वपक्षीय सहकार परिवर्तन पॅनल आणि महाविकास आघाडी मित्र पक्ष पुरस्कृत सहकार पॅनल अशी सरळ लढत होत आहे. प्रचारासाठी आता अवघे काही दिवस बाकी आहे. अशातच भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी एक गंभीर आरोप करत बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रार पत्र लिहिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘कृषी उत्पन्न बाजार समिती तळेगाव दाभाडे निवडणूक आदर्श आचार संहितेचा भंग करणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी भारतीय जनता पार्टी चे मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांकडे पत्राद्वारे केली आहे. ( Agricultural Produce Market Committee Election Talegaon Dabhade Maval Taluka BJP Ravindra Bhegde complaint letter to election decision officer )
काय म्हटलंय तक्रार पत्रात?
“मावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संचालकांना कर्ज वाटपाचे कारण सांगून कार्यालयामध्ये बोलावून घेऊन निवडणुकीचा प्रचार करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. सदर वि.का.से.स.सो. सचिव हे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून प्रचार करत आहेत. हा प्रकार आदर्श निवडणूक आचार संहितेचा भंग करणारा आहे. त्यामुळे आचार सहिंतेचा भंग करून एका ठराविक राजकीय पक्षाचा निवडणूक प्रचार करणाऱ्या अशा साचिवांवर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.” अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी दारुंब्रे गावचे माजी सरपंच राजेश वाघोले यांची नियुक्ती
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात