मावळ तालुका युवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी दारुंब्रे गावचे राजेश जगन्नाथ वाघोले यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांनी रविवारी (दिनांक 23 एप्रिल) त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ( former sarpanch of darumbre village rajesh waghole appointed as Maval Taluka Youth Congress President )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी युवक अध्यक्ष रोहिदास वाळूंज, तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, ॲड. खंडुजी तिकोने, ॲड. दिलीप ढमाले, अनंता लायगुडे, सोमनाथ कालेकर, असलम शेख, काळूराम बोडके आदी नेते यावेळी उपस्थित होते.
राजेश वाघोले यांनी दारुंब्रे गावच्या सरपंचपदी काम केलेले आहे. सरपंच, उपसरपंच पदाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाचा आदर्श ठसा उमठवला आहे. मावळ तालुक्यात त्यांच्यापाठी युवकांचे मोठे संघटन आहे. त्यामुळेच आता पक्षाने त्यांच्यावर युवक काँग्रेसची जबाबदारी दिली आहे.
युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील युवकांना संघटीत करून काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आणि बळकटीकरणाचे काम करणार आहे. तसेच पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजेश वाघोले यांनी नियुक्तीनंतर सांगिलते.
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– ‘नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य, लोणावळा इथे परिषदेचे आयोजन’ – शालेय शिक्षण मंत्री
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 : महाविकास आघाडीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ अन् विजयाचा ‘एल्गार’