वडगाव मावळ रेल्वे स्टेशन जवळ केशवनगर रेल्वे गेट इथे धावत्या रेल्वे मधून खाली पडल्याने एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार, दिनांक 25 एप्रिल) सकाळच्या सुमारास घडली. सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिच्या वर्णनानुसार तिला ओळखणारे कुणी असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशन जवळील केशवनगर रेल्वे गेट (किमी 154 / 22) इथे एक अनोळखी महिला गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत आढळली. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर महिलेचे वर्णन – महिला वय वर्षे अंदाजे 65, अंगात पोपटी रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या राखाडी रंगाची फुलाची साडी.
या वर्णनानुसार ओळखीच्या व्यक्तींनी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर महिलेचा मृत्यू हा धावत्या रेल्वेमधून खाली पडल्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तळेगाव रेल्वे पोलिस तोडमल हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ( Unidentified woman dies after falling from moving train near Vadgaon Maval railway station )
अधिक वाचा –
– मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी दारुंब्रे गावचे माजी सरपंच राजेश वाघोले यांची नियुक्ती
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी