मावळ तालुक्यात आधारकार्ड अद्ययावतीकरण अभियान सुरु आहे, परंतू आधारकार्ड मशीनची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यात आधार मशिनची संख्या वाढवावी. तसेच आधार अद्ययावतीकरण शिबिर आयोजित करावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने मावळ तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यावर तालुक्यात आधार मशिनची संख्या वाढवण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिले. यावेळी तहसीलदार देशमुख यांचा भाजपा तळेगाव दाभाडे शहर यांच्या वतीने तालुक्यात नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत सत्कार करण्यात आला. ( Talegaon Dabhade BJP Letter to Maval Tehsildar Vikram Deshmukh Regarding various issues related to Aadhaar )
याप्रसंगी भाजपा तळेगाव शहराध्यक्ष रविंद्र माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस श्रीमती रजनी ठाकूर, शोभा परदेशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, कामगार आघाडी अध्यक्ष अशोक दाभाडे, कार्याध्यक्ष स्वप्निल भेगडे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, सचिव वालावलकर, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागरशेठ शर्मा, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष सुनिल कांबळे, पदवीधर आघाडी कार्याध्यक्ष संतोष भोसले, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, का.आ.उपाध्यक्ष अनिल शेलार, शहर सचिव महावीर कनमुसे हे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना
– टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, पाहा संपूर्ण कार्यकारिणी