व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

रावेत येथील गायरान जागेवर उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
shrirang-barne-pcmc

Photo Courtesy : Shrirang Barane


पिंपरी : रावेत येथील गायरान जागेवर उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन ही गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवावी. यातून योग्य तोडगा काढावा, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली. तसेच आकुर्डीतील खंडोबा मंदिरालगतची मोकळी जागा कुस्त्यांच्या आखाडासाठी राखीव ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रावेत येथील गायरान जागा विकसित करणे आणि ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत, तसेच आकुर्डीतील खंडोबा मंदिर परिसर विकसित करण्याबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, तुकाराम भोंडवे, मधुकर भोंडवे, दिवानजी भोंडवे, व्ही.एस.काळभोर, शंकरराव पांढारकर, वैशाली काळभोर, गोविंदराव काळभोर आदी उपस्थित होते. ( Retain Gairan space at Rawet for public use MP Srirang Barane suggestion to administration )

रावेत येथील 16 एकर जागा महापालिकेला हस्तांतरित झाली आहे. त्यापैकी काही जागेवर पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. उर्वरित जागेवर पंतप्रधान आवास योजना प्रस्तावित आहे. रावेत येथे आवास योजना करु नये, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. आवास योजनेऐवजी परिसरातील नागरिकांसाठी उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थ आणि प्रशासनात समन्वय घडवून आणत बैठक घेतली. जागेचा योग्यरितीने वापर करावा. आवास योजनेला जागा देण्याविरोधात ग्रामस्थ न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढावा अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

हेही वाचा – कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

आकुर्डीतील खंडोबा मंदिर देवस्थान आकुर्डी, निगडी परिसरातील नागरिकांचे ग्रामदैवत आहे. आकुर्डीत खंडोबाचे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या लगत महापालिकेची मोकळी जागा आहे. या जागेवर यात्रा भरते. कुस्त्यांचे आखाडे होतात. वाहने पार्किंग केली जातात. महापालिकेने ती जागा देखभाल दुरुस्तीसाठी मंदिर समितीला द्यावी. कुस्त्यांच्या आखाडासाठी जागा राखीव ठेवावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याची ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

अधिक वाचा –
– टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान


dainik maval jahirat

Previous Post

टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Next Post

शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढा – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढा - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.