व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान

मावळची भुमी तमाम महाराष्ट्र वासियांसाठी पुण्यभुमी आहे. या मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असे नयनरम्य सौदर्यात येथील गडकिल्ले भर घालत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, व्हिडिओ, शहर
Gad-Kille-Swachhta-Abhiyaan

Photo Courtesy : Lonavala Police


महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मावळ प्रांतास फार महत्व असून मावळ ही एक ऐतिहासिक भुमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांचे साथीने याच मावळात स्वराज्याचा श्रीगणेशा केला. त्यामुळे हि मावळची भूमी तमाम महाराष्ट्र वासियांसाठी पुण्यभुमी आहे. या मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये नैसर्गिक सौंदर्याने ओतप्रोत असे नयनरम्य सौंदर्यात येथील गडकिल्ले भर घालत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

देशविदेशातून अनेक पर्यटक व गिर्याप्रेमी नेहमीच या गडकिल्यांना भेटी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे मावळाचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गडकिल्यांची तसेच बौध्दकालीन लेण्यांची स्वच्छता राखणे व त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून पुणे जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून टुरिझम पोलीसिंग अंतर्गत “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा” हे अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियांतर्गत लोणावळा उपविभागातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांची पोलीस, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, वकील यांचे सहभागातुन स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेची सुरूवात श्री एकविरा गड व कार्ला येथील बौध्दकालीन लेण्यांची स्वच्छता करून केली जाणार असून बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी साडेसहा वाजता अभियानाची सुरूवात होईल.

हेही वाचा – मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : “राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या सचिवावर त्वरित कारवाई करा”, भेगडेंच्या पत्राने खळबळ

पोलीस अधिकारी, अंमलदार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, पत्रकार, वकील यांचा या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग असेल, अभियानाच्या दुस-या टप्यामध्ये प्रत्येक आठवडयातील एक दिवस गडकिल्ले व लेण्यांची स्वच्छता केली जाणार असुन अभियानांतर्गत किल्ले लोहगड, किल्ले विसापुर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, किल्ले राजमाची, याचबरोबर कार्ला लेणी, भाजे लेणी, टायगर पॉईन्ट, लायन्स पॉईन्ट, राजमाची पॉईन्ट, भुशी डॅम व सर्वात शेवटी पर्यटन पंढरी लोणावळा शहराची देखील स्वच्छता केली जाणार आहे.

या अभियानाद्वारे ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण व संवर्धनाबरोबरच स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक (आयपीएस) यांनी सांगितले. या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले आहे.

अधिक वाचा –
– मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी दारुंब्रे गावचे माजी सरपंच राजेश वाघोले यांची नियुक्ती
– ‘नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य, लोणावळा इथे परिषदेचे आयोजन’ – शालेय शिक्षण मंत्री


dainik maval jahirat

Previous Post

चंद्रपूर इथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शाळेचे छत गेले उडून; 2 नागरिकांसह 36 शेळ्यांचा मृत्यू

Next Post

कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Agriculture-Award

कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.