सह्याद्री फाउंडेशन माध्यमातून एक दिवसीय ट्रीप चे आयोजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल ढोरे आणि नगरसेवक मंगेश खैरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. दररोजच्या धावपळीच्या जीवनातून ताण तणाव कमी करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात महाबळेश्वर येथील थंड हवेच्या ठिकाणी वडगाव शहरातील 125 युवकांनी या ट्रीपचा आनंद घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पैसा अनेकांकडे आहे पण निस्वार्थी पणे खर्च करण्याची दानत कमी लोकांकडे असते. काहीजन खर्च करतात पण हतचा राखून. असं म्हटलं जातं की राजकारणातील प्रत्येक व्यक्ती ही जेव्हा खर्च करते त्यावेळी त्याचा काहीतरी स्वार्थ असतो. मात्र, याउलट सुनील ढोरे यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता जीवाभावाच्या युवकांना घेवून महाबळेश्वर ट्रीपला नेले. राहायची सोय, नाश्ता पासून ते जेवणा पर्यंत उत्तम सोय केली. एवढेच नाही तर सायंकाळी रम्य वातावरणात ऑरस्केस्टा देखील ठेवला होता. हिंदी मराठी गाण्यांची मैफील ऐकण्याचा आनंद सगळ्यांनी लुटला. सुनील ढोरे यांचा स्वभाव, निस्वार्थी पणा, प्रत्येकाला मदत करणे त्यामुळे वडगाव शहरातील तरूण पिढी त्यांच्या भागे भक्कमपणाने उभी आहे. ( Vadgaon Maval NCP Sunil Dhore Birthday Special Mahabaleshwar Trip For Friends )
आमदार सुनील शेळके यांनी दिल्या शुभेच्छा –
आमदार सुनील शेळके, गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे व अन्य पदाधिकारी येणार होते. परंतू लग्न सोहळे, कृषी उत्पन्न बाजार निवडणुक त्यामुळे त्याना येता आले नाही. व्हिडिओ वरून आमदार सुनील शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले सुनील ढोरे यांचे समाज कार्याला तोड नाही. त्यामुळे आज युवकांचा संच त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. माझी येण्याची खूप इच्छा होती, पण कामामुळे येता आले नाही. सुनील व त्यांच्या सर्व सहका-यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या आशा अकांशा पूर्ण होवो ही पोटोबा महाराज यांच्या जवळ प्रार्थना करतो. यावेळी गणेश खांडगे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
मी जे काही करतो ते केवळ मित्रांसाठी – सुनील ढोरे
मी ही ट्रीप नेली. ही कोणतेही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेली नाही. जीवाभावाचे मित्र आहेत, त्यांचा ताणतणाव कमी व्हावा यासाठी महाबळेश्वर ट्रीप नेली. आगामी काळात माझ्या सह्याद्री फांऊडेशन व जीवाभावाचे मित्र यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या मागे भक्कम पणाने उभा राहून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जय मल्हार हाॅटेलचे मालक किरण ढोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
सुनील ढोरे, मंगेश खैरे, विजय सुराणा, चंद्रजीत वाघमारे, राजेश बाफना, विशाल वहिले, राहूल ढोरे, अतुल राऊत, सोमनाथ धोंगडे, शरद ढोरे, विकी ढोरे, आनंद बाफना, भाऊ कराळे, प्रविण ढोरे, अलताफ सैय्यद, गणेश माळसकर, संभाजी येळवंडे, राजेश ढोरे, सचिन वाडेकर, राहुल ढोरे, आबा ढोरे, अमोल ढोरे, गणेश ढोरे, विशाल चव्हाण, मयूर गुरव, अतुल ढोरे, जयदीप ढोरे, तुषार वहिले, राकेश वहीले, अनील कोद्रे यांच्या सह आदी जन उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ
– कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : पक्षविरोधी काम केल्याने पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी