मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन योजने अंतर्गत मौजे जांबवडे गावातील नळ पाणीपुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मंगळवार (दिनांक 25 एप्रिल ) रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला अनेक नेते, जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील #जांबवडे गावातील नळ पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनेसाठी सुमारे ९५ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे. #maval #JalJeevanMission pic.twitter.com/eUTyTZkkrX
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 25, 2023
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जांबवडे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून घरोघरी जलगंगा येणार आहे. येत्या काही दिवसात जांबवडे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. यासह मंगळवारी जांबवडेतील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, बंदिस्त गटार अशा विविध विकासकामांचे लोकर्पण करण्यात आले. ही विकास कामे झाल्याने निश्चितच गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. ( groundbreaking ceremony of tap water supply scheme under jal jeevan mission in jambawade village maval taluka )
अधिक वाचा –
– काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…जिवाभावाच्या मित्रांसाठी महाबळेश्वर एकदम ओक्के!! । Vadgaon Maval
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 16 जोडपी विवाहबद्ध; हजारो वऱ्हाड्यांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ