वडगाव मावळ : सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. वाढते बाष्पीभवन आणि पाण्याचा अधिकचा वापर, यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी हळू-हळू कमी होऊ लागली आहे. त्या अनुषंगाने वडगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करत असलेल्या इंद्रायणी नदीवरील जांभूळ, सांगवी, कातवी या ठिकाणी असलेले मुख्य बंधारे, जॅकवेल आणि पंप हाऊसची उपनगराध्यक्षा तथा पाणी पुरवठा सभापती सायली रुपेश म्हाळसकर यांनी बुधवारी (दिनांक 26 एप्रिल) रोजी पाहणी केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संबंधित बंधारे ठिकाणी भेट देत सद्यस्थितीत असलेल्या पाणी साठ्याची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ना दुरुस्त झालेले विधुत रोहित्र, पाणी पंप तसेच अपुऱ्या व आवश्यक असणाऱ्या सुविधा यांच्या नोंदी घेण्यात आल्या. या प्रसंगी पाणीपुरवठा विभाग अभियंता ताराचंद नेमाडे, विकास साबळे व कर्मचारी उपस्थित होते. ( deputy mayor saili mhalaskar inspected dams and pump houses that supply water to vadgaon maval city )
दैनिक मावळ – विशाल कुंभार (संपादक)
अधिक वाचा –
– ‘वडगाव नगरपंचायत सर्व प्रभागांत नळ पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट करणार’ – उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर
– काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…जिवाभावाच्या मित्रांसाठी महाबळेश्वर एकदम ओक्के!! । Vadgaon Maval