आंदर मावळ व नाणे मावळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी सुमारे सात कोटींचा निधी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झाला आहे. या रस्त्याचे भूमिपूजन बुधवार (दिनांक 19 एप्रिल) रोजी संपन्न झाले.
नाणे ते घोणशेत दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. विद्यार्थी, दुध व्यावसायिक, शेतकरी यांना या खराब रस्त्यावरुन दररोजच प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. याची दखल घेऊन आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध केला आहे. ( 7 crore fund for road connecting Andar Maval and Nane Maval said mla sunil shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्याचे काम होणार असून सात कोटी निधी उपलब्ध झाल्यामुळे सद्यस्थितीत तीन मीटर असणारा रस्ता साडेपाच मीटर होणार आहे. काही ठिकाणी डांबरी व आवश्यक त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे नाणे, नवीन उकसान, नाणोली, पारवडी, साई, वाऊंड, कचरेवाडी, घोणशेत येथील ग्रामस्थांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या भुमिपूजन समारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष किशोर सातकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, माजी उपसभापती गजानन शिंदे, वमाजी सरपंच सागर येवले, सरचिटणीस सचिन आंद्रे, दत्ता वाल्हेकर, दत्ता किंजल, सोमनाथ आंद्रे, अमोल वंजारी, रघुनाथ आंद्रे, सुधीर आंद्रे, सिकंदर मुलाणी, शंकर पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पिंगळे, विशाल पिंगळे, सोमनाथ पिंगळे, भाऊसाहेब दाभणे, अमोल कोंडे, नितीन शेलार, शेखर कटके, सोमा आंद्रे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन
– किवळे दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये; ‘वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे’ – नगरसेविका पुजा वहिले