व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोहळा कृतज्ञतेचा! बोरघाट बस अपघातात देवदूत बनून धावलेल्या विविध रेस्क्यू टीमच्या सहकाऱ्यांचा खास सन्मान

शनिवार, दिनांक 15 एप्रिल रोजी खंडाळा बोरघाटात झालेला बस अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 28 लोकांचे जीव वाचवण्यात यश आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 20, 2023
in महाराष्ट्र, मावळकट्टा
rescue-teams-khopoli-raigad

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


शनिवार, दिनांक 15 एप्रिल रोजी खंडाळा बोरघाटात झालेला बस अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 28 लोकांचे जीव वाचवण्यात यश आले होते. पहाटे चारच्या सुमारास अपघात झाल्यानंतर पुढे तब्बल 13 तास बचावकार्य सुरु होते. या बचावकार्यात सक्रीय सहभाग घेऊन अनेकांचे जीव वाचवणारे विविध रेस्क्यू टीमचे सदस्या यांच्यासोबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहभजनाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त माणुसकी हाच एक धर्म हा संदेश या कृतीतून दिसून आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली, यशवंती हायकर्स खोपोली, सजग सामाजिक संस्था खोपोली, देवदूत टीम, पोलिस, वाहतूक शाखा, शिवदूर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ( Honoring and lunching of rescue teams who helped in Borghat bus accident khopoli raigad )

खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयूब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. ॲम्बुलन्स ऑपरेटर, खाजगी आणि सरकारी डॉक्टर, मदतीसाठी आलेल्या सर्व नागरिक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली.

“मी महाराष्ट्रातला वेगवेगळ्या ठिकाणी गेली बावीस वर्षे नोकरी करत असताना एवढा मोठा एवढा भीषण अपघात मी कधी पाहिले नव्हता. या तीव्र अपघाताचे गांभीर्य ओळखून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, यशवंती हायकर्स खोपोली, देवदूत यंत्रणा आणि इतर सामाजिक संस्थांनी ज्या कौशल्यपूर्ण रीतीने हा सर्व घटनाक्रम हाताळला तो पाहता यांना एनडीआरएफ म्हणावे की काय असे वाटते त्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की हे एनडीआरएफ पेक्षा सरस आहेत. मी रायगडचा पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही केलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करतो.” – सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक रायगड)

हेही वाचा – बोरघाट बस अपघात । मुख्यमंत्री शिंदेंकडून दुःख व्यक्त, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मावळ तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मदतकार्य केले त्या स्वयंसेवकांची नावे खालीलप्रमाणे;
1)राजेंद्र कडू 2)महेश मसने 3)सचिन गायकवाड 4)योगेश उंबरे 5)सनी कडू 6)सुरज वरे 7)योगेश दळवी 8)हर्षल चौधरी 9)आदित्य पिलाने 10)अजय शेलार11)प्रवीण देशमुख 12)रिकी मते 13)प्रणय अंबुरे 14)ओंकार पडवळ 15)समीर जोशी 16)शैलश भोसले 17)संतोष खोसे 18)रमेश मते 19)संदीप गायकवाड 20)कपिल दळवी 21)दत्ता निपाने 22)जगन्नाथ गरवड 23)हरिश्चंद्र गुंड 24)सागर पाठक 25)दिनेश पवार 26)मधुर मुंगसे 27)अशोक उंबरे 28)गणेश रौंदळ 29)अमित बलकवडे 30)सदाशिव सोनार 31)चंद्रकांत गाडे 32)हनुमंत भोसले 33)केतन खांडेभरड 34)अमोल सुतार 35)कौशल दुर्गे 36)कमल परदेशी 37)निलेश गराडे 38)अनिल आंद्रे 39)सचिन वाडेकर 40)सत्यम सावंत 41)दक्ष काटकर 42)कुणाल कडु 43)के एस पिल्ले 44)सागर कुंभार 45)गणेश गिद 46)रितेश कुडतरकर 47)महादेव भंवर 48)सुनील गायकवाड, 49)अमित गुरव, 50)संजय पिंगळे, 51)वैभव मुंगसे 52) विशाल पाडाळे 53) साहील ढमाले

अधिक वाचा –
– आंदर मावळ आणि नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी – आमदार सुनिल शेळके
– देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन


Previous Post

आंदर मावळ आणि नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी – आमदार सुनिल शेळके

Next Post

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Politics

मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा आणि काँग्रेसची युती? राज्यात होतेय चर्चा! एकूण 40 उमेदवार रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.