लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बला’त्कार केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. जगदीश शंकर भोजने (वय 32, रा. जामखेड ता. अंबड जि. जालना) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बोऱ्हाडे वस्ती (साते ता. मावळ) येथील एका बांधकाम साइटवर मजुरी करणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या सव्वा वर्षाच्या काळात वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण केले. त्याचे पहिले लग्न झालेले आहे, हे लपवून ठेवून तिची फसवणूक करून तिच्याशी वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमुद आहे.
सदर पीडित महिलेने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भोजने याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विकास सस्ते पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन
– किवळे दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये; ‘वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे’ – नगरसेविका पुजा वहिले