राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात मावळचे माजी आमदार, राज्याचे माजी राज्यमंत्री ( Former Minister Of State ) बाळा भेगडे हे सहभागी झाले होते. तळेगाव येथील तलाव परिसरात शनिवारी ( 1 ऑक्टोबर ) हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ( Cleanliness Mission In Talegaon Dabhade City )
राष्ट्रनेता म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून (17 सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती दिनापर्यंत ( 2 ऑक्टोबर) हा सेवा पंधरवडा साजरा केला जातोय. या सेवा पंधरवडा अंतर्गत शनिवारी तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तळेगाव पालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि तळेगाव शहरातील नागरिकांनी मिळून स्वच्छता अभियान राबवले. तळेगाव येथील तलाव परिसरात सर्वांनी मिळून साफसफाई केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच यावेळी बाळा भेगडे ( Ex MLA Bala Bhegde ) यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहर दररोज स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्या नगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ( Cleanliness Mission In Talegaon Dabhade City Participation of Former Minister Of State MLA Bala Bhegde )
अधिक वाचा –
पक्षात बाळा भेगडेंचे वजन वाढतंय, आता पुन्हा नवी जबाबदारी! I Bala Bhegade BJP
वडगाव येथे मावळ भाजपची मासिक बैठक संपन्न, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडेंनी केले ‘हे’ महत्वाचे मार्गदर्शन
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’