व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आपदा मित्र आणि सखींना प्रशस्तीपत्रासह ओळखपत्र देऊन प्रांताधिकाऱ्यांनी केला सन्मान । Raigad News

कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमात प्रांताधिकारी अजित नेराळे यांनी आपला मित्र आणि सखी यांच्या सोबत चर्चा करून संवाद साधला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 20, 2023
in महाराष्ट्र
apada-mitra-raigad-district

Photo Courtesy : Gurunath Sathilkar


रायगड (खालापूर) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन‎ प्राधिकरण आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गर्शनाखाली खालापूर, कर्जत आणि माथेरान येथील प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखी यांना कर्जतचे प्रांताधिकारी अजित नेराळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या प्रशिक्षणार्थीना आगामी काळात आपत्ती व्यवस्थापन आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य करताना स्वतःची ओळख असावी या दृष्टिकोनातून ओळखपत्रही प्रदान करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कर्जत प्रांताधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमात प्रांताधिकारी अजित नेराळे यांनी आपला मित्र आणि सखी यांच्या सोबत चर्चा करून संवाद साधला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करताना येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक असलेल्या संसाधनांच्या संदर्भात सविस्तर आढावा घेतला.

मागील काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत स्थानिकांचा मदत करण्यात असलेला सहभाग हा उल्लेखनीय असतो, असे प्रतिपादन केले. आपदा मित्र आणि सखी या माध्यमातून मिळालेले प्रशिक्षण भविष्यकाळात मदतकार्य करताना अत्यंत उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त करताना कर्जत खालापूर आणि माथेरान येथील आपदा मित्र हे संपूर्ण संसाधनासह सर्वतोपरी सज्ज राहतील. अशी तरतूद केली जाईल असा विश्वास व्यक्त केला. ( raigad district khalapur taluka officer ajit nerale honored apada mitra by presenting them with certificates and id card )

हेही वाचा – ‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’

यावेळी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉ. शितल रसाळ, खालापूर तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि महसूल यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते. गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, हनीफ कर्जिकर, अमोल कदम, दिनेश सुतार, पंकज बागुल, सुमित गुरव, वर्षा मोरे,भक्ती साठेलकर अश्या जेष्ठ आणि युवा सदस्यांसह खालापूर, कर्जत आणि माथेरान मधील आपदा मित्र आणि सखी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा –
– तुमच्याकडेही 2 हजारच्या नोटा आहेत का? असल्यास ‘या’ पद्धतीने लावा त्या नोटांचा निकाल, जाणून घ्या सविस्तर
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा


Previous Post

‘बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात ‘हिंदू खतरे में है’ असं म्हटलं तर कसं होईल?’ राज ठाकरेंनी नेमकं कुणाला झापलं? वाचा सविस्तर

Next Post

शाळा सुधारणा ते आदिवासी वस्त्यांचा विकास, आमदार शेळकेंकडून ‘या’ कामांसाठी भरीव निधीची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

शाळा सुधारणा ते आदिवासी वस्त्यांचा विकास, आमदार शेळकेंकडून 'या' कामांसाठी भरीव निधीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.