पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सिक्युरिटी एजन्सीने रविवारी (दिनांक 28 मे) रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यातील एक शिबिर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामार्फत चाकण भागात एका खासगी कंपनीत, तर गरवारे रक्तपेढीमार्फत जनरल हॉस्पिटल तळेगाव या ठिकाणी दुसरे शिबिर घेण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यात एकूण 133 सुरक्षा रक्षक यांनी रक्तदान करून समाजसेवेत आपले योगदान दिले. चाकण विभागात एकनाथ रंगारी आणि विनायक शिंदे तर, जनरल हॉस्पिटल गरवारे रक्तपेढी इथे सर्जेस पाटील आणि मच्छिंद्र सूर्यवंशी या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले.
पूना सिक्युरिटी ही एजन्सी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पूरवत असताना असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेत असते. यासह अनेकदा वृक्षारोपणाचे देखील कार्यक्रम घेतले जातात. ( Blood donation camp in Chakan and Talegaon areas by Puna Security India Private Limited )
अधिक वाचा –
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News