शिरगाव ते सोमाटणे फाटा मार्गावर एका भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला असून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार (दिनांक 27 मे) रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार एमएच 14 – एचक्यू 0008 क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्यासोबत दुचाकीवर शिरगाव येथून सोमाटणे फाटा या मार्गावरुन जात होते. त्यावेळी रस्त्यावरून भरधाव वेगात आलेल्या कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली. तर फिर्यादी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अपघातानंतर अपघाताची माहिती न देता कारचालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक वाचा –
– काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, काही दिवसांपूर्वीच वडिलांचेही झाले होते निधन
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News