काँग्रेस (आय) पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. धानोरकर यांनी वयाच्या 48व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव एअर एम्ब्युलन्सद्वारे महाराष्ट्रातील त्यांच्या निवासस्थानी वरोरा इथे आणण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
बाळू धानोरकर हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने 28 मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना एअर एम्ब्युलन्सद्वारे नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होते, परंतू अखेर आज मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ( Lone Congress MP from Maharashtra Balu Dhanorkar passes away at 48 )
कॉंग्रेस पक्षाचे चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता आपण गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धानोरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी… pic.twitter.com/7eKiELulKi
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 30, 2023
Saddened to learn about the untimely passing away of Shri Suresh Narayan Dhanorkar, Congress MP (Lok Sabha) from Chandrapur Maharashtra. He was a grassroots leader.
Our deepest condolences to his family, friends and followers.
May they get the strength to overcome this loss. pic.twitter.com/gRO1ABPD4T
— Mallikarjun Kharge (@kharge) May 30, 2023
बाळू धानोरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. खरेतर खासदार बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचेही चार दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यांनंतर आज (दिनांक 30 मे) बाळू धानोरकर यांचेही निधन झाले. पिता-पुत्र्याच्या निधनामुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुळचे शिवसैनिक असलेले धानोरकर हे शिवसेनेकडून आमदारही झाले होते. 2019 च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा लढवली आणि जिंकली सुद्धा. मोदी लाटेत राज्यात निवडून येणारे ते काँग्रेसचे एकमेव खासदार होते.
अधिक वाचा –
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News